डाळींबापेक्षा वांगी महाग..

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

मोहोळ - सलग मागील चार महिन्यापासुन दराची मंदी, मोठा फवारणीचा खर्च, शेंडे व फळ अळीचा प्रादुर्भाव यामुळे बाजारातील आवक घटल्याने वांग्याने शंभरी गाठली आहे, सार्वजनिक व घरगुती सोहळ्यातुन वांग्याची भाजी गायब झाली आहे. सध्या डाळींबापेक्षा वांगी महाग अशी बाजारातील अवस्था आहे.

लागवडीपासुन दोन महिन्यात विक्रीस येणारे पिक म्हणुन वांग्याची लागवड केली जाते. ढगाळ वातावरण व रोग किडीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या चार महिन्यापासुन वांग्यावर मंदीचे सावट आहे. एकावेळी फवारणी करावयाची म्हणले तरी किमान चार हजार खर्च येतो, एवढे कष्ट घेऊनही बाजारात दर नसल्याने शेतकऱ्यांनी वैतागुन वांगी उपडुन टाकली तर कांहीनी उभ्या पिकात जनावरे सोडली.

परिणामी उत्पादन घटले, तर मागणीत वाढ झाली आहे. सध्या बाजारात डाळींब चारशे ते पाचशे रुपयास कॅरेट तर वांगे एक हजार रुपयास कॅरेट असे ऊलटे गणीत झाले आहे. टोमॅटोचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. या पिकावर गेल्या सलग आठ माहीन्यापासुन मंदी आहे. चालु आठवडयात थोडेसे दर वाढले आहेत.

येथुन पुढच्या काळात भाजीपाल्याचे दर चढेच राहणार आहेत कारण विहीरी, बोअरचे पाणी कमी झाले आहे. वांग्याचे दर वाढले म्हणुन कोणी त्याचा बाऊ करू नये. आम्ही पिकविलेला माल सोडुन इतर वस्तु खरेदी करताना आम्ही कधीही कुरकुर करीत नाही.- बाबुराव भोसले (शेतकरी पापरी)

WebTitle : marathi news price hike of brinjal due to high production cost   

संबंधित बातम्या

Saam TV Live