शेतकऱ्यांना बुरे दिन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

इंधनाच्या दरांबरोबर महागाईही दिवसेंदिवस नव-नवे उच्चांक गाठत आहे. त्यातच कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे खरीप वाया गेलाय. आता उरलेल्या 10 ते 15 दिवसांत तरी पाऊस पडेल याकडे डोळे लावून शेतकरी बसलाय. मात्र दुष्काळात तेरावा महिना म्हणावा त्याप्रमाणे आता खताच्या किमती वाढवत सरकारनं

शेतकऱ्यांना आणखी एक धक्का दिलाय. खताच्या प्रतिगोणीमागे 110 ते 250 रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्यात आलीय. 15 ते 20 टक्के इतकी मोठी ही दरवाढ आहे. त्यामुळे खतांच्या दरवाढीचा हा निर्णय आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय असंच म्हणावं लागेल.

महत्त्वाचं म्हणजे यंदा कमी पावसामुळे सरासरीच्या फक्त 25 टक्केच खतांची विक्री झालीय. त्यामुळे तब्बल अडीच लाख टन खतसाठा शिल्लक आहे. आणि तरीही ही दरवाढ करण्यात आल्यानं हा साठाही तसाच पडून राहण्याची शक्यता जास्त आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live