आता काही रेल्वे मार्गांवर धावणार खासगी ट्रेन्स

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

आतापर्यंत खासगीकरणापासून दूर राहिलेल्या रेल्वेचा प्रवास आता खासगीकऱणाच्या दिशेने सुरु झालाय. कमी गर्दीच्या आणि पर्यटन मार्गांवरील काही रेल्वे गाड्या खासगी कंपन्यांना देण्याच विचार केंद्र सरकार करतंय. त्यासाठी येत्या काही दिवसांत निविदाही काढण्यात येणार आहेत.

खासगीकरणाची सुरुवात IRCTC या रेल्वेच्याच कंपनीपासून करण्यात येणार आहे. IRCTCकडे दोन रेल्वे सेवांच्या संचालनाची जबाबदारी प्रायोगिक तत्त्वावर देण्यात येणार आहे. यासाठी IRCTC ठराविक रक्कम देण्यात येणार आहे. या अनुभवाच्या जोरावर खासगी कंपन्यांना प्रवासी रेल्वे वाहतुकीसाठी विचारणा कऱण्यात येईल. रेल्वे मार्गांचे खासगीकरण करण्यापुर्वी कामगार संघटनांसोबत चर्चा करण्यात येणार आहे

विशेष म्हणजे २०१५मध्ये बिबेक देबरॉय समितीने रेल्वे वाहतुकीत खासगी कंपन्यांचा समावेश करावा आणि रेल्वे बजेट बंद करावे अशा शिफारशी केल्या होत्या.. रेल्वेच्या खासगीकरण झाल्यास रेल्वेचा कारभार सुधारेल,सुविधाही वाढतील मात्र त्याच वेळी प्रवास महागण्याची भीती आहे. त्यामुळं रेल्वेचा प्रवास सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जाऊ शकते. त्यामुळं रेल्वेच्या खासगीकरणाचा विरोध होण्याची शक्यता आहे
 
संबंधित बातम्या

Saam TV Live