खासगी प्रवासी वाहनं जास्त भाडं आकारतायत? थेट फोन करा आणि करा तक्रार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 एप्रिल 2018

राज्यातली खासगी प्रवासी वाहनं तिकीट दर वाढवून प्रवाशांची सर्रास लूट करतात. याला आळा घालण्यासाठी कारवाईसंदर्भातला निर्णय  राज्य शासनाने घेतलाय. एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडं आकारता येईल असा निर्णय परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतलाय. तरीही यापेक्षा जास्त भाडं आकारुन प्रवाशांची अडवणूक करणा-यांविरोधात आता प्रवाशांना थेट तक्रार करता येणार आहे. प्रवाशांना मोटार वाहन विभागाच्या ०२२-६२४२६६६६ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवता येणार आहे.

राज्यातली खासगी प्रवासी वाहनं तिकीट दर वाढवून प्रवाशांची सर्रास लूट करतात. याला आळा घालण्यासाठी कारवाईसंदर्भातला निर्णय  राज्य शासनाने घेतलाय. एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडं आकारता येईल असा निर्णय परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतलाय. तरीही यापेक्षा जास्त भाडं आकारुन प्रवाशांची अडवणूक करणा-यांविरोधात आता प्रवाशांना थेट तक्रार करता येणार आहे. प्रवाशांना मोटार वाहन विभागाच्या ०२२-६२४२६६६६ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवता येणार आहे. तर मुंबईकर १८००२२०११० या निशुल्क टोल फ्री क्रमांकावरही तक्रारी नोंदवू शकतात. ऑनलाइन तक्रारदेखील नोंदवता येणार आहे. तक्रारीनंतर तातडीने चौकशी केली जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live