प्रियांका आणि निकने बांधली लग्नगाठ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 डिसेंबर 2018

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास आज (शनिवार) विवाहबंधनात अडकले. जोधपूरमधील आलिशान उमेद भवनमध्ये निक आणि प्रियांका यांचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विवाहाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज त्यांचा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

हैदराबाद : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास आज (शनिवार) विवाहबंधनात अडकले. जोधपूरमधील आलिशान उमेद भवनमध्ये निक आणि प्रियांका यांचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विवाहाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज त्यांचा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

प्रियांका-निक यांचा साखरपुडा सोहळा जुलै महिन्यात झाला होता. तेव्हापासूनच त्यांच्या विवाहाबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. त्यांचा विवाह ख्रिश्चन पद्धतीने पार पडला. त्यानंतर आता 2 डिसेंबरला पारंपारिक हिंदू पद्धतीने हे दोघे लग्न करणार आहेत. या विवाह सोहळ्यासाठी निक आणि प्रियांकाचे मित्र परिवार आणि नातेवाईक उपस्थित होते. निक-प्रियांका यांच्या विवाहसोहळ्यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूडमधील मोजकीच मंडळी उपस्थित होती.

मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडल्यानंतर आज त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आता निक-प्रियांका उद्या (ता.2) हिंदू पद्धतीने विवाह करणार असल्याने त्यांच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live