28 नोव्हेंबरपासून 3 डिसेंबपर्यंत प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचा लग्न सोहळा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

जोधपूरच्या 'उम्‍मेद भवन' पॅलेसमध्ये प्रियांका आणि निकचा विवाह होणार आहे. या लग्नसोहळ्याला २८ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून ३ डिसेंबपर्यंत हा सोहळा चालणार आहे.

आधी विराट अनुष्का नंतर दीपिका रणवीर आणि आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाची देशभरात चर्चा आहे. प्रियांका चोप्रा लवकरच अमेरिकन गायक निक जोनससोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नासाठी निक जोनस देखील दिल्लीत पोहचलाय.

जोधपूरच्या 'उम्‍मेद भवन' पॅलेसमध्ये प्रियांका आणि निकचा विवाह होणार आहे. या लग्नसोहळ्याला २८ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून ३ डिसेंबपर्यंत हा सोहळा चालणार आहे.

अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या प्रियांका आणि निकच्या लग्नाला पंतप्रधान देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी देखील हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे. त्याचसोबत  या लग्नाला मोदींसह अनेक नामवंत हजेरी लावणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

WebTitle : marathi news priyanka chopra nik jonas wedding ceremony details 

संबंधित बातम्या

Saam TV Live