मंदीचे वातावरण आहे हे भाजपने मान्य करून त्यावर उपाय शोधावा - प्रियांका गांधी

मंदीचे वातावरण आहे हे भाजपने मान्य करून त्यावर उपाय शोधावा - प्रियांका गांधी

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज सरकारवर पुन्हा एकदा कठोर शब्दांत टीका केली, एखादी खोटी गोष्ट शंभरवेळा सांगितली म्हणून ते काही सत्य ठरत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचे वातावरण आहे हे भाजपने मान्य करत त्यावर उपायदेखील शोधायला हवेत. मंदीमुळे ओढावलेली स्थिती सर्वांसमोर असून, सरकार आणखी किती काळ हेडलाइन मॅनेजमेंटच्या माध्यमातून काम चालविणार आहात, असा सवाल त्यांनी ट्‌विटच्या माध्यमातून केला आहे.

‘‘जीडीपीचा विकासदर पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की, अच्छे दिनची टिमकी वाजविणाऱ्या भाजपने अर्थव्यवस्थेला पंक्‍चर केले आहे, ना जीडीपी वाढतोय, ना रुपया मजबूत होतो आहे. रोजगार तर पूर्णपणे गायबच झाले आहेत. अर्थव्यवस्थाच नष्ट करण्याचे हे कृत्य कोणी केले हे तरी सरकारने आता जाहीर करावे,’’ अशी टीका त्यांनी दुसऱ्या ट्‌विटमधून केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच मुद्यावरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला होता. या मंदीच्या वातावरणास नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकराची (जीएसटी) घाईघाईत झालेली अंमलबजावणी हे दोन्ही घटक कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Web Title: Priyanka Gandhi today criticized the government

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com