@priyankagandhi : प्रियांका गांधी ट्विटरवर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे आधुनिक प्रचार अस्त्र असलेल्या ट्विटरवर आगमन झाले असून, त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे आधुनिक प्रचार अस्त्र असलेल्या ट्विटरवर आगमन झाले असून, त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

प्रियांका गांधी यांनी नुकतीच काँग्रेस मुख्यालयामध्ये सरचिटणीसपदाची औपचारिक जबाबदारी स्वीकारली होती. कार्यकर्त्यांशी संवाद साधून उत्तर प्रदेशात कामाला लागण्याचा संदेश त्यांनी दिला होता. तसेच त्यांनी रविवारी एक ऑडिओ मॅसेज पाठवून नव्या राजकारणाला सुरवात करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला होता. प्रियांकांकडे पूर्व उत्तर प्रदेशातील 43 जागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आज त्या लखनौमध्ये रोड शो मध्ये सहभागी होत आहे.

सोशल मीडिया हा आगामी निवडणुकीत महत्त्वाचे अस्त्र समजले जात असून, काँग्रेसकडून मोदी सरकारविरोधात त्याचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेही ट्विटरचा वापर करून सरकारवर टीका करतात. आता त्यांच्या जोडीला प्रियांका गांधी आल्या आहेत. अवघ्या काही तासांत त्यांचे 17 हजार फॉलोअर्स झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना फॉलो केले आहे. @priyankagandhi असे त्यांचे अधिकृत ट्विटर हँडल असून, प्रियांका गांधी वद्रा असे त्यांनी ट्विटर अकाउंटला नाव दिले आहे.

Web Title : marathi news priyanka gandhi vadra on twitter @priyankagandhi  


संबंधित बातम्या

Saam TV Live