बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादाबाबत मोठी बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राला आव्हान देणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी दाखल केली होती. मात्र, जयदेव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) ही याचिका मागे घेतल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद आता संपुष्टात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या खटल्यात शुक्रवारी जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दिला. यामध्ये त्यांनी सांगितले, की खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही. त्यामुळे मी याचिका मागे घेत आहे. जयदेव ठाकरे यांनी हा अर्ज मागे घेतल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात येणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

WebTitle : marathi news property of balasaheb thackeray jaydev thackeray shivsena uddhav thackeray  

संबंधित बातम्या

Saam TV Live