बंगळूरुमध्ये सनी लिओनीचे पोस्टर्स जाळलेत 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

बंगळूरु : कर्नाटकमध्ये बंगळूरु येथे अभिनेत्री सनी लिओनीचे पोस्टर्स जाळण्यात आली आहेत. तसेच, तिच्या विरोधात निदर्शनेही करण्यात आली आहेत. कर्नाटक रक्षण वैदिक समितीच्या सदस्यांनी सनीचा विरोध केला आहे. तिच्या विरोधात त्यांनी घोषणादेखील दिल्या आहेत. राज्यात तिचा प्रवेश आणि एका कन्नड चित्रपटातील तिच्या भुमिकेवरुन लोकांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्नाटक रक्षण वैदिक समितीच्या लोकांनी काल (ता. 22) सोमवारी टाउन हॉल येथे एकत्रित येऊन हा विरोध दर्शविला आहे. यावेळी सनीच्या 'वीरामहादेवी' या तमिळ चित्रपटातील भुमिकेवरूनही हे लोक नाराज असल्याचे बोलले जात आहे.

कन्नड संघटनानी विरोध केल्यानंतरही सनी 3 नोव्हेंबर रोजी बंगळूरुमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात भाग घेण्याची अनुमती तिला पोलिसांनी दिली आहे. कन्नड़ संघटना कर्नाटक रक्षण वैदिकने सांगितले होते की, वीरामादेवी ही एक योद्धा होती आणि सनी लिओनीने त्यांची भूमिका करणे म्हणजे त्यांचा अपमान आहे.

WebTitle : marathi news protest against sunny leone  in Bangalore 

संबंधित बातम्या

Saam TV Live