चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांमध्ये कोरोनाची लक्षणं न दिसताही रिपोर्ट्स पॉझिटिव्ह...

साम टीव्ही
बुधवार, 22 एप्रिल 2020

एवढा प्रदीर्घ काळ कोरोना बाधित व्यक्ती इतरांशी भेटत असते आणि कोरोना विषाणूचा फैलाव अन्य लोकांमध्येही होत रहातो, त्यामुळे ही बाब चिंतेत भर घालणारी मानली जातीय. 

कोरोनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर येतीय. राज्यात सापडलेल्या जवळपास 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. केवळ 17 टक्के रूग्णांमध्येच कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही चिंता वाढवणारी बाब मानली जातीय.

 राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. राज्यात जवळपास 5 हजार लोकांना कोरोनाची लागण झालीय. मात्र या धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. म्हणजेच राज्यात आढळून आलेले तब्बल 81 टक्के रुग्ण हे कोरोनाची लक्षणंविरहित आहेत. आतापर्यंत केवळ 393 रुग्णांमध्येच कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. हे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या 17 टक्के आहे.

दुसरीकडे देशभरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून न आलेल्या रुग्णांचं प्रमाण 80 टक्के एवढं आहे. देशामध्ये कोरोनाचे 80 टक्के रुग्ण असे आहेत की त्यांच्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाही, असं इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हंटलंय. देशातील 80 टक्के रूग्ण लक्षणेविरहित आहेत. त्यांना शोधून काढणं हे सरकारसमोर मोठं आव्हान आहे.

देशातील सर्व लोकांची एकाच वेळी चाचणी करणे अशक्य आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही, असंही डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलंय.. कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर लक्षणं दिसण्यासाठी 1 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. अशा स्थितीत एखादी व्यक्ती आपणाला कोरोनाची बाधा झालेली नाही, असे समजून इतरांना भेटत असते. म्हणजेच एवढा प्रदीर्घ काळ कोरोना बाधित व्यक्ती इतरांशी भेटत असते आणि कोरोना विषाणूचा फैलाव अन्य लोकांमध्येही होत रहातो, त्यामुळे ही बाब चिंतेत भर घालणारी मानली जातीय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live