पुलवामा हल्ल्यातील दोघा मास्टरमाईंडचा खात्मा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

पुलवामा हल्ल्यातील दोघा मास्टरमाईंडचा खात्मा करण्यात आल्याची मोठी अपडेट समोर येतेय. अतिरेकी अब्दुल रशिद गाझी आणि कामरान यांना कंठस्नान घालण्यात आलंय. ज्या इमारतीत अतिरेकी लपले होते, ती इमारत ब्लास्टने उडवणयात आली आहे.

सूत्रांच्या हवाल्याने आलेली ही माहिती म्हणजे सैन्याची अतिरेक्यांविरोधात ही मोठी कारवाई मानली जातेय. पुलवामामध्ये सैन्याच्या कारवाईला मोठं यश मिळालंय. भारतीय सेनेकडून मात्र अद्यप याबद्दल अधिकृत माहिती कळवण्यात आलेली नाही. 

गाझी रशिद आणि कामरान यांनी मिळूनच पुलवामा हल्ल्याचं कारस्थान रचल्याचं बोललं जातंय. जैशचे कमांडर असलेल्या गाझी रशिद आणि कामरान यांना सैन्यानं सकाळपासूनच घेरलं होतं. दरम्यान, ज्या इमारतीत हे जैशचे अतिरेकी लपले होते, ती इमारतच सैन्यानं उडवून लावली आणि अतिरेक्यांना यमसदनी धाडलंय. 

Webtitle : marathi news pulwama terror attack indian army killed gazi rashid and kamran 

संबंधित बातम्या

Saam TV Live