Pulwama Terror Attack :100 तासांत त्यांचा खातमा केला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

श्रीनगर : पुलवामात स्फोट घडवून जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा लष्कराने 100 तासांत खातमा केल्याचे लष्कराने आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

पुलवामा हल्ल्याचा घाव बसलेल्या भारतीय जवानांनी सोमवारी या हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशिद गाझी ऊर्फ कामरान याला चकमकीत ठार केले. पुलवामामध्येच झालेल्या या चकमकीत लष्करातील एका मेजरसह चार जवानांनाही हौतात्म्य आले. यानंतर आज लष्कराने पत्रकार परिषद घेत या हल्ल्याबाबत माहिती दिली. 

धिल्लन म्हणाले, की जैशे महंमद ही दहशतवादी संघटना पाकिस्तानी सैन्याचेच पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या मदतीमुळेच हा हल्ला करण्यात आला. आतापर्यंत अनेक गाझी काश्मिरमध्ये आले. आम्ही त्यांना यमसदनी पाठविणारच. जैशे महंमदने आयएआयच्या मदतीने हा हल्ला केला. यात कोणालाही शंका नाही. पुलवामात सोमवारी ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणापासून स्थानिक नागरिकांनी दूर राहावे. आम्ही 100 तासांच्या आता 3 दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. या चकमकीत जखमी झालेल्या जवानांची प्रकृती सुधारत आहे.

Web Title: marathi news Pulwama Terror Attack masterminds killed within 100 hours   

संबंधित बातम्या

Saam TV Live