'ह्या' तंत्रज्ञानामुळे आता ऐकता येईल इंग्रजी बोलणे मराठीत!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 मार्च 2019

"सी-डॅक'कडून स्पीच-टू स्पीच' भाषांतराचे तंत्रज्ञान विकसित 

पुणे - एखादा माणूस इंग्रजीत बोलत असताना, त्याचे संभाषण तुम्हाला तुमच्या भाषेत ऐकू आले तर! काय, आश्‍चर्य वाटतंय ना! अहो, पण हे लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे बरं का! एवढंच नव्हे तर तुम्ही मराठीतून साधलेला संवाद त्या संबंधित माणसाला त्यांच्या इंग्रजीत ऐकू जाणार आहे. हो, देशात "स्पीच-टू स्पीच' भाषांतर करण्याचे नवे तंत्रज्ञान "सी-डॅक'मार्फत विकसित होत आहे. 

"सी-डॅक'कडून स्पीच-टू स्पीच' भाषांतराचे तंत्रज्ञान विकसित 

पुणे - एखादा माणूस इंग्रजीत बोलत असताना, त्याचे संभाषण तुम्हाला तुमच्या भाषेत ऐकू आले तर! काय, आश्‍चर्य वाटतंय ना! अहो, पण हे लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे बरं का! एवढंच नव्हे तर तुम्ही मराठीतून साधलेला संवाद त्या संबंधित माणसाला त्यांच्या इंग्रजीत ऐकू जाणार आहे. हो, देशात "स्पीच-टू स्पीच' भाषांतर करण्याचे नवे तंत्रज्ञान "सी-डॅक'मार्फत विकसित होत आहे. 

केंद्र सरकारच्या "नॅशनल ट्रान्सलेशन मिशन'अंतर्गत हे तंत्रज्ञान विकसित होत आहे. यात सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कंप्युटिंग (सी-डॅक) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामध्ये "स्पीच-टू-स्पीच' भाषांतर प्रणाली विकसित केली जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात इंग्रजी भाषेतील संभाषण हिंदी, मराठी, बंगाली, तमीळ अशा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित होणार आहे; तर दुसऱ्या टप्प्यात प्रादेशिक भाषांचे अंतर्गत संभाषण अनुवादित करण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करताना विशेषत: पर्यटकांना या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा होईल. भाषांमुळे येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल, असा विश्‍वास "सी-डॅक'चे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी व्यक्त केला. 
या मिशनची मुख्य जबाबदारी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लॅंग्वेजेस संस्थेकडे आहे. मिशनमध्ये सी-डॅकसमवेत साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, सेंटर फॉर सायंटिफिक अँड टेक्‍निकल टर्मनॉलॉजीस्‌ अशा संस्थांचा सहभाग आहे; परंतु "स्पीच-टू-स्पीच' तंत्रज्ञान विकसित करण्याची मुख्य जबाबदारी "सी-डॅक'वर असल्याचे डॉ. दरबारी यांनी सांगितले. 

देशात साकारतोय स्वदेशी "मायक्रोप्रोसेसर' 
संपूर्णपणे स्वदेशी पद्धतीचे फोअर कोअर मायक्रोप्रोसेसर तयार करण्याचे काम देशात वेगाने सुरू आहे. मायक्रोप्रोसेसरची अंतिम चाचणी दोन महिन्यांत केली जाणार आहे. ती यशस्वी झाल्यास प्रत्यक्ष वापरात येणाऱ्या या मायक्रोप्रोसेसरच्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 85 कोटी रुपये खर्च करून "सी-डॅक'ने 18 महिन्यांमध्ये हा प्रोसेसर तयार केला आहे. "मायक्रोप्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम'अंतर्गत याची निर्मिती झाली. आतापर्यंत मायक्रोप्रोसेसर दुसऱ्या देशातून आयात करावे लागत होते. मात्र, आता देशात डेटा सुरक्षित ठेवण्याची स्वदेशी यंत्रणा विकसित होत आहे, असे डॉ. दरबारी यांनी सांगितले. 

मेट्रोसाठीही "डेबिट कम वॉलेट कार्ड' 
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) अंतर्गत मेट्रो प्रकल्पात स्टेशनवरील प्रवेशाची यंत्रणा "सी-डॅक'ने प्रायोगिक तत्त्वावर विकसित केली. त्यानंतर मेट्रो रेल प्रकल्पासाठी कम्युनिकेशन सिस्टिम कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याशिवाय "डेबिट कम वॉलेट कार्ड' लवकरच विकसित केले जाणार आहे. या कार्डद्वारे बस, रेल्वे, मेट्रो, बीआरटी, टॅक्‍सी, रिक्षा अशा प्रवास भाडे देण्याबरोबरच शॉपिंगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे. यासाठी बॅंकांशी बोलणे सुरू असल्याचे डॉ. दरबारी यांनी नमूद केले.

Web Title: Listen to English in Marathi


संबंधित बातम्या

Saam TV Live