सावकारी जाचास कंटाळून युवकाची आत्महत्या, पत्नीला व्हॉट्‌सॲपवरून दिली होती माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 एप्रिल 2019

पुणे - सावकारी जाचास कंटाळून एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार धायरी येथे समोर आला. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने त्याच्या पत्नीला व्हॉट्‌सॲपवरून मेसेज करून याची माहिती  दिली होती. 

पुणे - सावकारी जाचास कंटाळून एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार धायरी येथे समोर आला. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने त्याच्या पत्नीला व्हॉट्‌सॲपवरून मेसेज करून याची माहिती  दिली होती. 

यशवंत हरिभाऊ पवार (वय ५४, रा. रायकर मळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवार यांनी काही खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. ते वसूल करताना त्यांना त्रास दिला जात असल्याने ते नैराश्‍यात होते. पवार यांनी गुरुवारी दुपारी पत्नीला व्हॉट्‌सॲपवर मेसेज करून, आत्महत्या करणार असल्याचे सांगितले व चिठ्ठी पाठवून दिली. त्यानंतर धायरी येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन विषारी औषध पिले. सायंकाळी पाचला पवार यांच्या पत्नीने हा मेसेज पाहिला, त्यांना याचा धक्का  बसला. 

दरम्यान, दोन तरुणांना पवार बेशुद्ध पडल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पवार यांचे खिसे तपासले असता, त्यात चिठ्ठी आढळली. त्यामध्ये त्यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले. 

पवार हे विजेच्या कामाचे ठेकेदार होते. त्यांनी नारायण पेठेतील दोघांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू असून, अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. पवार यांच्या मागे पत्नी, मुलगा असा  परिवार आहे.

Web Title: suicide due to Lender harassment in pune


संबंधित बातम्या

Saam TV Live