अख्खं कुटुंबच गेलं, मदतीचे पैसे द्याचे तरी कोणाला ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 जून 2019

पुणे : कोंढव्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले बहुतांशजण हे एकाच कुटुंबातील आहेत. एकाचवेळी कुटुंबातील सर्वचजण दगावल्यामुळे महापौर, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केेलेल्या मदतीची रक्कम नक्की द्यायची कोणाकडे असा प्रश्न उभा राहिला आहे. 

या दुर्घटनेत मृत्यू झालेले बहुतांशजण हे एकाच कुटुंबातील आहेत, तसेच एकमेकांचे नातेवाईकही आहेत. या घटनेत संपूर्ण कुटुंबसह, नातेवाईक आणि त्यांची मुलेही मृत्यूमुखी पडली आहेत. घटनास्थळी महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट दिली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना काही लाख रुपये देण्याची घोषणाही केली. पण आर्थिक मदतीचे धनादेश नेमके द्यायचे कोणाला असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे.

या दुर्घटनेनंतर राज्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना एक लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडून चार लाखाची मगत जाहीर करण्यात आली आहे. 

Web Title: 15 dead in the Kondhwa Accident in Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live