हवेच्या प्रदुषणामुळे पुण्यात लहान मुलांमध्ये वाढला दमाविकार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 मार्च 2019

पुणे - शहरातील हवेत प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने पुण्यामध्ये दमाविकार वाढत आहे. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत असून, पुण्यातील सहापैकी एका मुलाला दमा असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

पुणे - शहरातील हवेत प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने पुण्यामध्ये दमाविकार वाढत आहे. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत असून, पुण्यातील सहापैकी एका मुलाला दमा असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

दमा हा खरे तर आजार नाही. तो कोणाला आणि कधीही होण्याचा धोका असतो. श्‍वासनलिका बारीक झाल्याने हा आजार होतो. पण, ही श्‍वासनलिका बारीक होण्यामागे हवा प्रदूषण, हे सर्वांत मोठे कारण असल्याची माहिती शहरातील वेगवेगळ्या छातीरोगतज्ज्ञांनी दिली.  
पुण्यात हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. त्यानंतर उन्हाच्या वाढत्या चटक्‍याबरोबर ही  प्रदूषणाची पातळी कमी होते. पण गेल्या दोन दिवसांपासून शहरातील हवेची प्रदूषणाची पातळी ‘वाईट’ असल्याचे निरीक्षण भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’ने नोंदविले आहे. येत्या सोमवारीही (ता. २५) हवेची गुणवत्ता चांगली राहणार नसल्याचा अंदाज वर्तविला आहे. याचा थेट परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होत आहे. 

घरातील प्रदूषण
सध्या आपण घराबाहेरील प्रदूषणाबाबत बरीच चर्चा करतो. पण, घरात होणाऱ्या प्रदूषणाकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ‘सॉफ्ट टॉइज’, ‘कारपेट्‌स’, सोफा कव्हर यातून मोठ्या प्रमाणात धूलिकण श्‍वासामार्फत शरीरात पोचतात. त्यामुळे त्याची स्वच्छता नियमित करावी. 

का वाढतोय दमा?
  घरातील हवादेखील शुद्ध नाही. त्यात अनेक धूलिकण फिरत असतात.
  शहरातील प्रदूषणाची सातत्याने वाढत
  असलेली पातळी
  शहरात जागोजागी पेटविण्यात येणारा कचरा
  वाहनांमुळे रस्त्याच्या कडेची उडणारी धूळ
  बांधकामांचे वाढलेले प्रमाण

जीवनशैलीचा परिणाम
  सध्या शहरात प्रदूषण वाढत असल्याने दम्याचा त्रास जाणवत असला, तरी आपली बदलती    जीवनशैलीदेखील तितकीच कारणीभूत असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा दावा
  आपल्याला दमा झालाय, हे रुग्ण स्वीकारण्यास तयार होत नाही
  दमा झाला म्हणजे आता इन्हेलर कायम सुरू राहणार, असा लोकांमध्ये गैरसमज  

Web Title: Asthma is one of six children


संबंधित बातम्या

Saam TV Live