चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवासाला केरळमध्येच "ब्रेक' लागला आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' अतितीव्र चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाल्याने पुढील प्रगती थांबली आहे. 

"वायू' चक्रीवादळ निवळल्यानंतर मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण निर्माण होणार आहे. बंगालच्या उपसागरातील शाखेची प्रगती शक्‍य असून, दोन दिवसांत ईशान्येकडील आणखी काही राज्यांत मॉन्सून पोचेल, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. 

मॉन्सूनची यंदाची वाटचाल खूपच अडखळत सुरू आहे. आगमनास प्रतिकूल स्थिती असल्याने यंदा केरळात नियमित वेळेच्या तब्बल आठवडाभर उशिराने मॉन्सून केरळात डेरेदाखल झाला. मॉन्सून साधारणतः 13 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोचण्याची शक्‍यता असतानाच अरबी समुद्रात "वायू' वादळ निर्माण झाले. चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वाटचाल प्रभावित झाली. तसेच, समुद्रावरील बाष्प ओढून घेतल्याने मॉन्सूनचे राज्यातील आगमनही लांबले आहे. "वायू' चक्रीवादळ निवळल्यानंतर पुन्हा पोषक स्थिती निर्माण होण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. याच काळात बंगालच्या उपसागरातून मॉन्सूनची प्रगती शक्‍य आहे. 

Web Title: vayu cyclone breake Monsoon rain

संबंधित बातम्या

Saam TV Live