मला झालेली मारहाण चुकीची; दोषींवर कारवाई झाली पाहिजे : राजेंद्र निंबाळकर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे : मारहाणाची घटना ही वैयक्तिक हल्ला नसून, आपली कामे रेटण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाविरोधात उचलले पाऊल आहे, अशा शब्दांत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी त्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला. मला झालेली मारहाण चुकीची आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, पोलिस कार्यवाही करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

जलपर्णी काढण्याच्या बनावट निविदाप्रकरणी आंदोलन करीत, महापालिकेतील विरोधी पक्षांनी निंबाळकर यांना सोमवारी किरकोळ मारहाण केली. या घटनेच्या निषेर्ध महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले. त्याआधी निषेध सभा घेतली. महापालिका आयुक्त सौरभ राव, पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नैना गुंडे, अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांच्यासह महापालिकेतील खातेप्रमुख सहभागी झाले होते. 

राव म्हणाले, "निविदा जादा दराने आली होती. मात्र ती मंजूर केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारे जाब विचारणे आणि मारहाण करणे योग्य नाही.'' दरम्यान, घटनेचा निषेध म्हणून सर्व खात्याचे काम दिवसभर बंद राहणार असल्याचे कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले. 

Web Title: Action should be taken against the guilty: Rajendra Nimbalkar

संबंधित बातम्या

Saam TV Live