पुण्यातील जुना बाजार चौकात लोखंडी होर्डींग कोसळून तिघे ठार, चार अत्यवस्थ

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

पुणेः शहरातील जुना बाजार चौकात आज (शुक्रवार) दुपारी होर्डिंग्जचा लोखंडी सांगाडा काढताना तो कोसळला. यावेळी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. खासगी होर्डिंग्ज कंपनीचे लोक काम करीत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन कडून जुन्या बाजाराकडे येणाऱया रस्त्यावरील चौकात ही दुर्घटना घडली. होर्डिंगखाली सहा रिक्षा, दोन दुचाकी, एक मोटार दबल्या गेल्या. या वाहनांमध्ये असलेले नागरिक गंभीर जखमी झाले होते. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आठ जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. शिवाय, एक मुलीचा पाय तुटला आहे. दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.

दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या व पोलिस दाखल झाले आहेत. वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

WebTitle : marathi news pune advertising hoarding collapsed on auto two died three in ICU 

संबंधित बातम्या

Saam TV Live