सांस्कृतिक शहर पुण्याची हवा दिल्लीपेक्षा रोगट; 'सफर'चा धक्कादायक अहवाल

अमोल कविटकर, पुणे
बुधवार, 19 जून 2019

उत्तम पर्यावरण आणि निरोगी वातावरणामुळेच प्रत्येक जण वास्तव्यासाठी पुण्याला पहिली पसंती देतो. मात्र, तुमच्या आवडत्या पुण्याला प्रदूषणाची काजळी लागलीय. पुण्याच्या हवेत मोठ्या प्रमाणात घातक अतिसूक्ष्म धूलिकण आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण दिल्लीतील हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहेत. 

केंद्र सरकारच्या 'सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च' अर्थात सफर या संस्थेने केलेल्या रिसर्चमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आलीय..विशेष म्हणजे वाहनांमधून होणाऱ्या घातक वायू उत्सर्जनामुळे हवा प्रदुषित होतंय.

सफरच्या अहवालानुसार  पुण्यातील हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ५३ टक्क्यांवर पोहोचलंय तर राजधानी दिल्लीत हे प्रमाण ४९ टक्के आहे. हे धूलिकण श्वसनाद्वारे थेट पुणेकरांच्या शरीरात जात असून त्यामुळे श्वसनासह अनेक गंभीर आजार होतायेत. प्रदुषण ही जगासमोरची मोठी समस्या आहे. त्यामुळं याकडे वेळीच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live