पुणे विमानतळाचं खासगीकरण करण्याचे निर्देश

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

पुणे विमानतळाचं खासगीकरण करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत. नफ्यात असणाऱ्या १५ पैकी ८ विमानतळांचे खासगीकरण वेगाने हालचाली करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाने नीती आयोग आणि अर्थमंत्रालयाला दिले आहेत. त्यात पुणे विमानतळाचाही समावेश आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या विमानतळांचे चालू आर्थिक वर्षात खासगीकरण केले जाईल. मोदी सरकारकडून एअर इंडिया आणि राज्यांच्या मालकीच्या हॉटेल्सची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हॉटेल आणि विमानतळ देखभालीतून लाभ मिळत नसल्याचं सरकारचे म्हणणं आहे.

पुणे विमानतळाचं खासगीकरण करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत. नफ्यात असणाऱ्या १५ पैकी ८ विमानतळांचे खासगीकरण वेगाने हालचाली करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाने नीती आयोग आणि अर्थमंत्रालयाला दिले आहेत. त्यात पुणे विमानतळाचाही समावेश आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या विमानतळांचे चालू आर्थिक वर्षात खासगीकरण केले जाईल. मोदी सरकारकडून एअर इंडिया आणि राज्यांच्या मालकीच्या हॉटेल्सची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हॉटेल आणि विमानतळ देखभालीतून लाभ मिळत नसल्याचं सरकारचे म्हणणं आहे. पुण्याशिवाय लखनौ, जयपूर, चेन्नई, कोलकाता, कोची, अहमदाबाद आणि गुवाहाटी या विमानतळांचेही खासगीकरण होणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live