पोलिसानी उचलला गुन्हेगाराच्या शिक्षणाचा खर्च, गुन्हेगाराला प्रवाहात आणले

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 जुलै 2019

पुणे : गुन्हेगार असला तरी काय झाले, त्याला सुधारण्यासाठी पोलिसच कायमच प्रयत्न करत असतात. पण, आपण असे एक उदाहरण पाहणार आहेत की ज्यामुळे खरंच सलाम या वर्दीला असे म्हटल्याशिवाय आपण राहणार नाही. पुण्यातील हडपसर पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी एका अल्पवयीन गुन्हेगाराला मुख्य प्रवाहात आणत त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

गुन्हेगारीकडे वळलेल्या एका अल्पवयीन मुलामधील ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रसाद लोणारे यांनी मोठे पाऊल उचलले. लोणारे यांनी या तरुणाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्याला गुन्हेगारी जगातून बाहेर काढण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

हडपसर परिसरात राहणाऱ्या १४ वर्षाचा अशोक (नाव बदलले आहे) परिस्थितीमुळे नकळत गुन्हेगारी कृत्ये करण्यास प्रवृत्त झाला. मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार करणाऱ्या अशोकच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या, प्रत्येकवेळी त्याला कायद्याची भीती दाखवत समजावून सांगत सोडण्यात आले. मात्र, तरीदेखील त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नव्हता. मात्र, एपीआय लोणारे यांनी त्याला या भाईगिरीच्या प्रवृत्तीचा शेवट काय होतो हे विविध घटनांमधून समजावून सांगितले. वाईट काम सोडण्यासाठी लोणारे यांनी दिलेला आत्मियतेचा सल्ला त्याला पटला. यामुळे अर्ध्यावर शिक्षण सोडलेल्या या अल्पवयीन अशोकमध्ये पुढील शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली.

मात्र, घरची हालाखीची परिस्थिती असल्याने शिक्षण घेता येणार नाही असे त्याने लोणारेंना सांगितले. ही बाब कळताच एपीआय लोणारे यांच्यातील बापमाणूस जागा झाला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मी तुझा शिक्षणाचा खर्च करण्यास तयार असल्याचे त्याल सांगितले. पण, पुन्हा गुन्हेगारीकडे वळला तर बघं अशी वडीलकीच्या नात्याने सक्त ताकीदही दिली. लोणारे यांनी अशोकच्या हाती असणारे कोयते आणि तलवारी काढून घेत पेन आणि वही दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: API Prasad Lonare help to juvenile criminal in Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live