श्रीमंत दगडूशेठ गणपती पुढे तब्बल 25 हजार महिलांचं सामुहिक अथर्वशीर्ष पठण

श्रीमंत दगडूशेठ गणपती पुढे तब्बल 25 हजार महिलांचं सामुहिक अथर्वशीर्ष पठण

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल २५ हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे पाच वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणरायाच्या नामाचा जयघोष करत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या महिलांचा आनंदही पाहण्याजोगा होता.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्यास विधान परिषदेच्या  उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, शुभांगी भालेराव यांसह महिला कार्यकर्त्या आणि परदेशी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे ३३ वे वर्ष होते. तब्बल ३३ वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा. याकरीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी या उपक्रमाला सुरुवात झाली. केवळ १०१ महिलांपासून सुरु झालेल्या उपक्रमात आज २५ हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Atharvashirsha pathan on front of Dagdusheth Ganpati in Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com