पुण्यात बसची तोडफोड; भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पुणे : इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून, दोन ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. बंदला पाठिंबा देत मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेवर रस्त्यावर आणि चित्र शाळा (अलका टॉकिज) येथील बसची तोडफोड केली. भारत बंदमुळे पीएमपी बसची तोडफोड होत असली तरी पीएमपीएल, एसटी, रिक्षा सेवा, रेल्वेची लोकल सेवाही आज सकाळपासून सुरळीत सुरू आहे.

भारत बंदच्या दरम्यान पुण्यातील अनेक पेट्रोलपंप बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होताहेत , बंदच्या पार्शवभूमीवर अनुचित घटना घडू नये म्हणून काही पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील कुलकर्णी पेट्रोल पंप बंद ठेवला आहे. उंड्री बिशप शाळेच्या प्रशासनाने शाळा बंद ठेवली आहे.

एसटी सेवा सुरळीत, मात्र प्रवाशांची संख्या कमी
आज भारत बंद असला तरी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन स्थानकातील सर्व बस सेवा नियोजित वेळेत सुरू आहे. कोणत्याही मार्गावर अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पुणे विभागाच्या व्यवस्थापक यामिनी जोशी यांनी दिली. बंदमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचेही त्यांनी सांगितले.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live