महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या असतील, तर बारामती जिंकावीच लागेल : अमित शहा

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या असतील, तर बारामती जिंकावीच लागेल : अमित शहा

पुणे : महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या असतील, तर त्यासाठी बारामती जिंकावीच लागेल. तेथे विजयी मिळाल्यानंतरच ४५ जागा होतील, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.

शक्ती केंद्र संमेलन आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज (शनिवार) पुणे दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुणे, बारामती आणि शिरूर या मतदारसंघांबाबत आढावा घेतला. यासह मोदी सरकारने केलेल्या योजनांविषयी माहिती देत विरोधकांवर जोरदार टीका केली.

शहा म्हणाले, की अयोध्येत त्याच जागेवर लवकर भव्य राम मंदिर होणारच, त्यासाठी भाजप कटीबद्ध आहे. अयोध्येत मंदीर बांधल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी राम मंदिराविषयी भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांच्या आघाडीकडे ना नेता, ना नीती आहे. देशात मजबूत सरकार केवळ मोदीच देऊ शकतात.

Web Title: BJP must win Baramati to help Narendra Modi get back to power, says Amit shah

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com