पुण्यातल्या चितळेंना दूधबंद आंदोलनाचा फटका 

पुण्यातल्या चितळेंना दूधबंद आंदोलनाचा फटका 

राज्यात दूध दरवाढीबाबत आंदोलनाचा आज तिसरा दिवस असला. तरी पुण्यात दूध पुरवठ्यावर परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही. मात्र दोन दिवसांनी तुटवडा जाणवू शकतो असं दूध वितरकांचं म्हणणं आहे.

दूधबंद आंदोलनाचा फटका पुण्यातल्या चितळेंना बसलाय.  पुण्यात चितळे दुधाचं सर्वाधिक वितरण होतं. चितळेंकडे दिवसाला सुमारे साडेदहा लाख लिटर दूध संकलन होतं. त्यातील साडेचार लाख वितरित केलं जातं.. मात्र त्यांचं दूध संकलन दोन दिवस बंद असल्याने आज साठवणुकीतल्या दूधाचं वितरण करण्यात आलं. परिणामी आज दूधकोंडी फुटली नाही तर उद्या दूध वितरण शक्य होणार नसल्याचं सांगण्यात आलंय.

दूध दरवाढीच्या आंदोलनाचा दूध वितरणाला फटका बसू नये याकरता, पोलिस संरक्षण पुरवण्यात आलं खरं. मात्र पुण्यात पोलिस संरक्षणात असलेल्या दुधाच्या गाड्याच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काही आक्रमक कार्यकर्त्यांनी 4 ते 5 टँकर अडवून जोरदार दगडफेक केली.

WebTitle : marathi news pune chitale bandhu milk agitation effect 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com