पुणे शहर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेलं पुणे शहर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहिती नुसार पुण्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. 

सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेलं पुणे शहर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहिती नुसार पुण्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. 

पुणे शहरामध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलाच्या विशेष शाखेकडून हा इशारा देण्यात आला. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी बंगले, हॉटेल, लॉजचे मालक, भाडेकरू व जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यास देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनोळखी व्यक्तीला कार, फ्लॅट भाड्याने न देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सदनिका, खोल्या, बंगले, प्रार्थनास्थळे, धर्मशाळा, हॉटेल्स, लॉज आदी निवासी क्षेत्रामध्ये अतिरेकी किंवा देशविघातक कृत्य करणाऱ्या व्यक्ती वास्तव्य करून पाहणी करण्याची शक्‍यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे. यामुळे संबंधित ठिकाणांचा वापर करू देणारे मालक, भाडेकरू यांची तसेच जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

WebTitle : marathi news Pune city on the target of terrorist high alert issued in the city 


संबंधित बातम्या

Saam TV Live