Loksabha 2019 : पुणे शहरबाबत काँग्रेसकडून उदासीनता

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 मार्च 2019

पुणे - पुणे वगळता राज्यातील सर्वच उमेदवारांची नावे कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणे शहराबाबत पक्षाकडून एवढी उदासीनता का, असा सवाल आता शहर कॉंग्रेसमधील नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांकडूनच उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान, पुणे शहराच्या उमेदवारीवरून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात एकमत होत नसल्यामुळे उमेदवाराच्या नावाची घोषणा रखडल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या आणि प्रदेशच्या नेत्यांनी "कामाला लागा' असे आदेश दिलेल्या अरविंद शिंदे यांनी आज दुसऱ्या दिवशीही गाठीभेटींवर भर दिला; तर शहर कॉंग्रेसकडून आज बूथ कमिटी सदस्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्राचे प्रभारी अमित साहिया यांनी घेतले. उमेदवाराची वाट न पाहता शहर कॉंग्रेसकडून हळूहळू प्रचाराच्या कामात गती घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. 

पक्षाकडून मोहन जोशी आणि अरविंद शिंदे दोघेही दावेदार आहेत. जोशी यांचे नाव मल्लिकार्जुन खर्गे यांनी लावून धरले आहे; तर अशोक चव्हाण यांनी शिंदे यांच्यासाठी आग्रह धरला आहे. ही दोन्ही नावे प्रदेशकडून कॉंग्रेस कमिटीकडे यापूर्वीच पाठविण्यात आली आहेत; परंतु दोन्ही नेत्यांकडून त्यांनी सुचवलेल्या नावाचा आग्रह कायम असल्याने शिंदे किंवा जोशी यांपैकी एका नावावर एकमत होत नसल्याचे सांगितले जाते. पक्षाकडून शिंदे यांचे नाव निश्‍चित झाल्याचे गेल्या दोन दिवसांपासून सांगण्यात येत आहे. मात्र, अधिकृतपणे नावाची घोषणा होत नसल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. 

गायकवाडांच्या पक्षप्रवेशानंतर उमेदवाराची घोषणा 
मुंबई येथे उद्या (ता. 30) प्रवीण गायकवाड यांचा कॉंग्रेस प्रवेश होणार आहे. या वेळी कॉंग्रस पक्षाचे सर्व प्रदेशचे नेते उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात पुण्याच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. 

Web Title: Congress indifference to Pune candidature

संबंधित बातम्या

Saam TV Live