पुण्यातील कोरोना स्थिती भयंकर बनणार, रुग्णसंख्या वाढणार आणि बेड्स कमी पडणार

साम टीव्ही
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020
  • पुण्यात बिग बेड्स क्रायसिस
  • रुग्णसंख्या वाढणार, बेड्स कमी पडणार
  • पुण्यातील कोरोना स्थिती भयंकर बनणार

आधीच पुण्यात बेड्स आणि ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव जातोय. त्यातच स्मार्ट सिटीने अंदाज वर्तवलाय की येत्या काळात पुण्यात बिग बेड्स क्रायसिस  निर्माण होईल. म्हणजे रुग्ण वाढतील आणि बेड्स अपुरे पडू लागतील. 

पुणे करोनाचं हॉटस्पॉट बनलंय. रुग्णांना कुठे बेड मिळत नाहीये, कुठे व्हेंटिलेटर, कुठे अँब्युलन्स. हे सगळं सुरु असतानाच. स्मार्ट सिटीने चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त केलाय. या अंदाजानुसार स्थिती आणखी गंभीर बनणार आहे. या अंदाजानुसार, 21 सप्टेंबरपर्यंत 1 लाख 46 हजार 182 

पुण्यात बिग बेड्स क्रायसिस?

वाढत्या रुग्णसंख्येनुसार लागणारे बेड्स

ऑक्सिजन बेड - 5107
आयसीयू 1,702
व्हेंटिलेटर - 851

सध्या उपलब्ध असलेले बेड्स
ऑक्सिजन बेड 3,423
आयसीयू -453
व्हेंटिलेटर 483

अंदाजानुसार कमी पडणारे बेड्स 

ऑक्सिजन बेड -1684
आयसीयू -1249
व्हेंटिलेटर 368

एककीडी स्मार्ट सिटीने हा अंदाज व्यक्त केलाय, तर दुसरीकडे पुण्याच्या महापौरांनी प्रशासन बेड्स उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय.

यापूर्वीही असे अंदाज वर्तवण्यात आलेत.. मात्र सध्या हाताबाहेर जाणारी कोरोना स्थिती पाहता या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करायला हवाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live