पुणे-पिंपरी आजपासून काय सुरु काय बंद वाचा...

साम टीव्ही
शुक्रवार, 24 जुलै 2020

मात्र दोन दिवसांचा लॉकडाऊन करून 5 दिवस दुकानं सुरू ठेवावी, या पुणे व्यापारी महासंघाच्य़ा मागणीवर मात्र अद्याप निर्णय झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. आजपासून 13 जुलैपूर्वी सारखीच परिस्थिती कायम असणार आहे. लॉकडाऊन संपल्यावर आजपासून इथली दुकानं, खासगी कार्यालयं सुरू करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष अधिकारी सौरव राव यांनी दिलीय.

मात्र दोन दिवसांचा लॉकडाऊन करून 5 दिवस दुकानं सुरू ठेवावी, या पुणे व्यापारी महासंघाच्य़ा मागणीवर मात्र अद्याप निर्णय झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 

काल राज्यात 9 हजार 895 नवीन रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 47 हजार 502 इतकी झालीय. काल कोरोनामुळे राज्यात 298 रुग्णांचा मृत्यू झालाय. कालच्या एका दिवसात 6 हजार 484 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.09 टक्के एवढं झालंय. राज्यात सध्या 1 लाख 40 हजार 092 रुग्ण उपचार घेतायत.

देशभरात तब्बल 49 हजार 310 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झालीये. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 24 तासातली ही देशातील विक्रमी रुग्णवाढ नोंदवण्यात आलीये. रुग्ण वाढल्याने देशातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण वाढलाय. दरम्यान गेल्या 24 तासात 740 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. तर देशात 4.40 लाखाहून अधित एक्टीव्ह रुग्ण आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live