पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या खात्यांवर हॅकर्सचा डल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवण्यासाठी सर्वसामान्य बँकेत खाती उघडतात. पण जेव्हा त्या खात्यांवरच डल्ला मारला जातो, तेव्हा ग्राहकांनी काय करावं, असा सवाल उपस्थित करणारा प्रकार पुण्यात घडलाय.

आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवण्यासाठी सर्वसामान्य बँकेत खाती उघडतात. पण जेव्हा त्या खात्यांवरच डल्ला मारला जातो, तेव्हा ग्राहकांनी काय करावं, असा सवाल उपस्थित करणारा प्रकार पुण्यात घडलाय.

पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या खात्यांवर हॅकर्सनी डल्ला मारला आहे. पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड शाखेचे सर्व्हर हॅक करुन, हॅकर्सनी तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये हाँगकाँग हैनसेन बँकेतील एका खात्यात जमा करण्यात आले आहेत. पहिला सायबर हल्ला कॅनडातून तर दुसरा हाँगकाँगमधून झालाय. ही घटना 11 ऑगस्ट रोजी घडली असून, याप्रकरणी एएलएम ट्रेडिंग कंपनी आणि अज्ञात आरोपींविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेच्या वीसा आणि रूपी डेबिट कार्डधारकांची गोपनीय माहिती मिळवून हॅकर्सनी कोटयावधी रुपये लाटले आहेत. दरम्यान, ठेवींबाबत खातेदारांनी घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचं बँक व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील दोन-तीन दिवस कॉसमॉस बँकेचे सर्व एटीएम बंद राहणार आहेत. सुरक्षेच्या कारणांवरून हा निर्णय घेण्यात आलाय. 

WebTitle : marathi news pune cyber attack on cosmos bank 94 crore loot 


संबंधित बातम्या

Saam TV Live