'दादा, मी प्रेग्नंट आहे'; पुण्यात पुन्हा अनोखं होर्डिंग

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे : सध्या पुणे-मुंबईत एकाच होर्डिंगची चर्चा आहे, ती म्हणजे 'दादा, मी प्रेग्नंट आहे'. असे आशयाचे होर्डिंग पुणे-मुंबईतील विविध ठिकाणी लागले आहेत. हे होर्डिंग वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, अशा आशयाचे होर्डिंग लावण्यामागचे नेमके कारण काय याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

पुण्यातील वर्दळीचा परिसर असलेल्या खंडूजी बाबा चौकात हे होर्डिंग लावण्यात आले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे होर्डिंग लावले असल्याची माहिती मिळत आहे. या होर्डिंगवर लिहिलेल्या वाक्याचा अर्थ काय हेच उत्सुकता वाढविणारे ठरत आहे. हे होर्डिंग लावण्यामागचा विषय काय हे कळू शकले नाही. सकाळपासून येणारे-जाणारे नागरिक या होर्डिंगकडे पाहत आहेत. ही एक जाहिरात आहे का, असाही तर्क लावला जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये 'शिवडे, आय एम सॉरी' अशा आशयाचे होर्डिंग लावण्यात आले होते. त्यानंतर आता हे होर्डिंग लावण्यात आले आहे.

WebTitle :: marathi news pune dada mi pregnant aahe hoardings catching eyes of everyone 

संबंधित बातम्या

Saam TV Live