'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' मोहिमेअंतर्गत महापौरांनी तरुणास लावला रस्ता साफ करायला!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 मार्च 2019

पुणे : 'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' या मोहीमेअंतर्गत काही दिवसांपुर्वी पुण्यात रस्त्यांवर थुंकणाऱ्यावर दंड वसुली आणि रस्ता साफ करुन घेण्याची कारवाई केली जात होती. या स्वच्छता मोहीमेला बळ देण्याच्या दृष्टीने उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी उचलेले पाऊल महत्वाचे ठरले. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाला थुंकताना पाहिले. त्याचे काम धरुन ती जागा साफ करुन घेतली. उपमहापौरांच्या या कार्यवाहीमुळे लोकही सहभागी झाले आणि संबधित तरुणास पुन्हा शहरात थुंकणार नाही अशी शपथ घेण्यास भाग पाडले. आपल्या चुकीची जाणीव झालेल्या तरुणाने सर्वांची माफी मागितली. 

दरम्यान, आज सकाळी उपमहापौर धेंडे आपल्या प्रभागात नागपुर चाळ, फुले नगर येथे स्वच्छतेची पाहणी करत होते. त्यावेळी ते बस थाब्यांजवळ उभे असताना दुचाकीवर आलेल्या तरुण रस्त्यावर थुंकला. त्यानंतर धेंडे यांनी दुचाकीवर त्या तरुणाचा पाठलाग केला.  त्या त  थुंकलेल्या ठिकाणी आणले आणि  'ती' जागा साफ करुन घेतली. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीन सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा लोकांकडून दंड वसुल करताना संबधित जागा साफ करुन घेतली जाते. या मोहिमेची जबाबदारी महापालिकेच्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांवर आहे. पहिल्या टप्प्यात दणक्यात सुरु झालेली मोहीम गेल्या काही दिवसात मात्र  थंडावली आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौरांनी उचलेले पाऊल या मोहिमेला बळकटी देणारे ठरले. 
 
Web Title: The Deputy Mayor take action against spit on the road in pune

संबंधित बातम्या

Saam TV Live