धनंजय मुंडे यांच्यावर सरकारी जमीन हडपल्याच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जून 2019

पुणे : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सरकारी जमीन हडपल्याच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिले आहेत.

मठाला इनाम म्हणून दिलेली जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून विकत घेतली. जगन्मित्र सहकारी साखर कारखान्यासाठी ही जमीन विकत घेण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने राजाभाऊ फड यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवरही ताशेरे ओढले आहेत. गुन्हा नोंद करून सविस्तर तपास केला जावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. 

दरम्यान, ही जमीन सरकारी आहे, असा कुठेही उल्लेख नाही. ती मठातील विश्वस्तांच्या नावावर आहे आणि कारखान्यासाठी ही जमीन धनंजय मुंडे यांनी विकत घेतली, असे मुंडे यांच्या वकिलांनी पत्रकारांना सांगितले. या प्रकरणी धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Web Title : Dhananjay Munde has been booked under the charge of land grabbing

संबंधित बातम्या

Saam TV Live