ढोल पथकांसाठी पुणे पोलिसांची कडक नियमावली.. काय आहेत नियम 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या ढोल पथकामध्ये वादकांची कमाल संख्या 52 असावी, अशी मर्यादा पोलिसांनी घातली आहे. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत तीन आणि अन्य मंडळांच्या मिरवणुकीत दोन पथकांनाच परवानगी देण्यात येणार आहे.

पोलिसांच्या या निर्णयावर ढोल ताशा पथकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये किती वादक, वाद्ये असावीत, या संदर्भातील आचारसंहिता गेल्या वर्षीच्या तुलनेत पोलिसांनी आणखी कडक केली आहे.

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व वादकांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणेशोत्सव मंडळांना तीन पथके लावण्याची परवानगी देण्यात आली असून, इतर मंडळांना दोन पथके लावण्याची परवानगी मिळाली आहे.

WebTitle : MARATHI NEWS PUNE DHOL PATHAK RULES AND REGULATION BY PUNE POLICE 

संबंधित बातम्या

Saam TV Live