आज नाटक छोट्या रंगभूमीपुरतं मर्यादित नसून डिजिटल माध्यमातून जगभर पोचलं : ज्येष्ठ नाटककार डॉ. सतीश आळेकर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 मार्च 2019

पुणे - ‘जागतिक रंगभूमी दिन १९५२ मध्ये सुरू करण्यात आला. आज नाटक केवळ छोट्या रंगभूमीपुरतं मर्यादित न राहता डिजिटल माध्यमातून जगभर पोचलं आहे,’’ असे ज्येष्ठ नाटककार, अभिनेते व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे माजी प्रमुख डॉ. सतीश आळेकर यांनी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सांगितले.

ज्येष्ठ गायक चंद्रकांत काळे म्हणाले, ‘‘मूळ जर्मन भाषेतील ‘थ्री पेनीज ओपेरा’ या गाजलेल्या संगीतकाचे ‘तीन पैशांचा तमाशा’ हे पुलंनी केलेले मराठीतील रूपांतर लोकप्रिय झाले. त्यातील पाश्‍चात्त्य संगीत व भारतीय उपशास्त्रीय संगीत यांचा मेळ फार छान होता. त्यात मी भूमिका करायचो. पुलंच्याच ‘वाऱ्यावरची वरात’ या मराठी मातीच्या नाटकातही भूमिका करायचो.

वेगवेगळ्या धाटणीच्या या दोन नाटकांमधील अभिनय करताना जे अनुभवले ते पुलंच्या जन्मशताब्दी संदर्भात जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने आज आठवते आहे.’’

Web Title: Digital Drama Publicity satish aalekar chandrakant kale

संबंधित बातम्या

Saam TV Live