'आयसीयू'तल्या रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार

अश्‍विनी जाधव केदारी
मंगळवार, 13 मार्च 2018

पुणे : 'आयसीयू'मध्ये दाखल असलेल्या एका महिला रुग्णावर उपचार करताना डॉक्‍टरने चक्क मांत्रिकालाच बोलावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या महिलेचा काल पहाटे मृत्यू झाला. 

संध्या सोनवणे (वय 24, राहणार : दत्तवाडी) असे या महिलेचे नाव आहे. छातीत दुधाची गाठ झाल्याने सोनवणे यांच्यावर उपचार सुरू होते. यासाठी त्यांना 'आयसीयू'मध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी स्वारगेट येथील एका रुग्णालयामध्ये सोनवणे यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान डॉक्‍टरांनी मांत्रिकाला बोलाविल्याचे उघड झाले आहे. 

'सोनवणे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली. त्यात रक्तस्राव झाला आणि त्यांना जीव गमवावा लागला', असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गरीबांवर उपचार होतात. या ठिकाणी मांत्रिक बोलाविल्याची माहिती मिळत आहे. हा मांत्रिक रुग्णाच्या नातेवाईकांनी बोलाविला की रुग्णालयाने हा चौकशीचा भाग आहे. पूर्ण माहिती घेतल्यानंतर यावर बोलू', असे बापट म्हणाले. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शिवसेनेचे शहर संघटक सचिन तावरे यांच्यापर्यंत यासंदर्भात तक्रार गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

संबंधित बातम्या

Saam TV Live