''ठाकरे' सिनेमा आज प्रदर्शित, संपूर्ण महाराष्ट्रात याच सिनेमाची चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

पुणे : बहुचर्चित ''ठाकरे' सिनेमा आज प्रदर्शित झाला. संपूर्ण महाराष्ट्रात याच सिनेमाची चर्चा आहे. बाळासाहेबांची जन्मभूमी असलेले पुणे शहर तर या आघाडीवर आहे. पुण्यातील थिएटरबाहेरही आज जुन्या व नव्या दमाच्या शिवसैनिकांची चित्रपटासाठी गर्दी दिसली.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला आणि संपूर्ण देशभरात आज प्रदर्शित होत असलेला ‘ठाकरे’ चित्रपट बघण्यासाठी शिवसैनिकांसोबत अनेक मान्यवर रसिक आस लावून बसले आहेत. हा चित्रपट शिवसैनिकांना मोफत बघता यावा यासाठी पुण्यात शिवसैनिकांकडून, शिवसैनिकांसाठी ठाकरे चित्रपट पुणे शहरातील विजय टॉकीज तसेच सिटीप्राईड कोथरुड या सिनेमागृहातील ‘फस्ट डे फस्ट शो’ बुक केला.

सकाळी 9 आणि 11 वाजताचे शो बुक आहेत. यावेळी जे जुने शिवसैनिक आहेत त्यांचा चित्रपट सुरू होण्यापूर्वी सत्कार करण्यात आला. आता चित्रपट कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title: Discussion of the 'THAKREY' movie in entire Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live