पतंगाचा मांजा अडकून गळा चिरल्याने दुचाकीवरील डॉक्‍टर तरुणीचा जागीच मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

पिंपरी - पतंगाचा मांजा अडकून गळा चिरल्याने दुचाकीवरील डॉक्‍टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाण पुलावर रविवारी (ता. ७) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. 

पतंगाचा मांजा अडकून गळा चिरल्याने दुचाकीवरील डॉक्‍टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाण पुलावर रविवारी (ता. ७) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. 

डॉ. कृपाली निकम (वय २६, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. धामणगाव, चाळीसगाव, जि. जळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कृपाली या पुण्यावरून भोसरीकडे जात होत्या. त्या नाशिक फाट्यावरील दुमजली उड्डाण पुलावरून जाताना पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला अडकल्याने त्या दुचाकीवरून कोसळल्या. त्यांचा गळा खोलवर चिरल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तेथील नागरिकांनी त्यांना तातडीने भोसरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी त्या उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. याबाबत भोसरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

मांजाने गळा कापल्याने ‘सकाळ’च्या जाहिरात आणि मार्केटिंग विभागातील कर्मचारी सुवर्णा मुजुमदार या ७ फेब्रुवारी रोजी जखमी झाल्या होत्या. त्यांचा ११ फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. 

Web Title: marathi news pune doctor on two wheeler died due to manjha 


संबंधित बातम्या

Saam TV Live