गिरीश बापट यांची अधिकाऱ्यांवर आक्रमक भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली कुठे आहेत, नेमक्‍या अडचणी काय आहेत, अशी विचारणा करीत विषयांचा पाठपुरावा करण्याची तंबीच बापट यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. भामा आसखेड, लोहगाव विमानतळ परिसरातील कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. 

शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बापट यांनी महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. 

समान पाणीपुरवठा योजना आणि नदी सुधारणा योजना रखडल्या आहेत. या दोन्ही योजनांची कामे ज्या वेगाने अपेक्षित होती; त्यानुसार ती होत नसल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. तेव्हा पाण्याच्या टाक्‍यांची काही कामे थांबल्याचे सांगण्यात आले. तसेच, नदीसुधार योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगिलते. त्यावर वेळोवेळी पाठपुरावा का केला नाही, असा प्रश्‍न बापट यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यामुळे अधिकारी गोंधळले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांचीही बापट यांनी "हजेरी' घेतल्याचे सांगण्यात आले. 

निवडणुकीच्या दिशेने... 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाच्या प्रकल्पांची उद्‌घाटने, भूमिपूजने आटोपण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपचा आहे. येत्या दोन-अडीच महिन्यांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. या कामांचा वेग वाढविल्यास फायदा होण्याची आशा भाजपला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Web Title: Girish Bapat taken to task officer of the municipal administration

संबंधित बातम्या

Saam TV Live