विमान स्वच्छतागृहातून सोन्याची ५३ लाखांची बिस्किटे जप्त

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

पुणे - सोन्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने दुबईहून विमानातून आणलेली ५३ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे साडेचार वाजता जप्त करण्यात आली. विमानाची तपासणी करताना अधिकाऱ्यांना स्वच्छतागृहात एक हजार ६६३ ग्रॅम वजनाची १४ बिस्किटे आढळली.

आखाती देशातून विमानातून सोन्याची तस्करी करण्याच्या वाढलेल्या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कडक तपासणी करण्यावर भर दिला जातो. दरम्यान, रविवारी पहाटे दुबईहून आलेले स्पाईस जेटचे विमान लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्या वेळी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांची तपासणी केली. तसेच, त्यांना संशय आल्याने त्यांनी विमानामध्ये तपासणी करण्यास सुरवात केली. 

विमानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहातील वॉश बेसीन टेपमध्ये १४ बिस्किटे लपवून ठेवल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. एक हजार ६६३ ग्रॅम वजनाची अन्‌ ५३ लाख रुपये किमतीची बिस्किटे कस्टम ॲक्‍ट १९६२ अन्वये जप्त केली. कोणत्या प्रवाशाने दुबईहून सोन्याची बिस्किटे आणण्याचा प्रयत्न केला, याचा तपास करण्यात येणार आहे. 

सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे, उपायुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पळणीटकर, विनिता पुसदेकर, बाळासाहेब हगवणे, घनश्‍याम जोशी, अश्‍विनी देशमुख, संदीप भंडारी, ए. एस. पवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Gold Biscuit Seized on Lohgaon Airport Crime

संबंधित बातम्या

Saam TV Live