अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मानधनवाढीसह पेन्शन देणार केंद्र सरकार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

पुणे - अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना केंद्र सरकारच्या मानधनवाढीसह पेन्शन देण्याबाबत आर्थिक तरतूद करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार यांनी दिली. 

अंगणवाडी कृती समितीने मुंबईत आझाद मैदानावर मंगळवारी निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मानधनवाढ जाहीर केली; परंतु, ती अद्याप दिलेली नाही. या मानधनवाढीची अंमलबजावणी करावी, इतर राज्यांप्रमाणे किमान १२ हजार रुपये मानधन आणि मानधनाच्या निम्मी मासिक पेन्शन द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. 

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव अजोय मेहता आणि सचिव विनिता वेद सिंघल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मानधनवाढ देण्याचे आश्‍वासन देण्यात आले, असे पवार यांनी सांगितले.

Web Title: Government gives pension to Anganwadi sevikas

संबंधित बातम्या

Saam TV Live