संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीला दिले गरम तव्याचे चटके 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

पिंपरी (पुणे) : पत्नीने पतीकडे दूध आणि भाजी आणण्यासाठी पैसे मागितले. या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीला गॅसवरील गरम तव्याचे चटके दिले. ही घटना थेरगाव येथे शुक्रवारी सकाळी घडली.

मंगेश दत्ताराम दाभोळकर (वय ३५) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. मनाली दाभोळकर (वय ३०, दोघेही रा. कैलासनगर, थेरगाव) असे जखमी पत्नीचे नाव असून त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनाली यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास आपले पती मंगेश यांच्याकडे भाजी आणि दूध आणण्यासाठी पैसे मागितले. यामुळे संतापलेल्या पतीने गॅसवरील गरम तव्याने मनाली यांना चटके दिले. तसेच डोके जमिनीवर आपटून जखमी केले. पोलीस हवालदार आर. जी. टिळेकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Husband harassed wife for asking money 

संबंधित बातम्या

Saam TV Live