पुणे शहरात थंडीची तीव्रता वाढली, पुढील तीन दिवसांत आणखी थंडीचा कडाका राहण्याची शक्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

पुणे : शहरात पुन्हा थंडीची तीव्रता वाढली असून, आज (शनिवार) यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. शहरात किमान तापमान 5.1 अंश सेल्सिअस इतके नोंदले असून, पुढील तीन दिवसांमध्ये आणखी थंडीचा कडाका राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

राज्यातील पारा घसरला असून, शुक्रवारी नीचांकी तापमान नगर येथे 9.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. आज त्याखाली तापमान गेले असून, निफाडला सर्वांत कमी 4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर, महाबळेश्वरला -2 इतके तापमान होते. अनेक ठिकाणी हिमकण साचले होते. पुण्यातही थंडीचा कडाका जास्त होता. 

पुण्यात गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव होता. त्यामुळे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेला किमान तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. पण, या बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव ओसरला आहे. त्याच वेळी उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडी पडत आहे. शहरातील पुढील तीन ते चार दिवस आकाश निरभ्र राहणार असल्याने थंडीचा कडाका अजून वाढेल, असा अंदाज आहे.

Web Title: Intensity of the cold wave has risen again in pune, possibility of further cold wave in next three days

संबंधित बातम्या

Saam TV Live