पुण्यात आंतरराष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धेचे आयोजन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

पुणे : पुणे  आणि ऑस्टिन  या शहरांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटीवरील आंतरराष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धेचे पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा उद्देश पुणे आणि अमेरिकेतील ऑस्टिन या शहराशी विकासाचे करार करण्याकरिता होणार आहे. या कराराद्वारे स्मार्टसिटीसाठी उपयुक्त डिजाईन, नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्याकरिता होणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे पुणे आणि अमेरिकेतील ऑस्टिन या शहराशी जोडण्यात येणार आहे. 

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व टीमला त्यांचा प्रोजेक्ट मूल्यमापनाकरिता स्पर्धेच्या पर्यवेक्षकांकडे द्यावा लागेल. या स्पर्धेसाठी अमेरिकेतील टेकसास विद्यापीठ ,पीआयसीटी महाविद्यालय, ग्रेटर आस्तिन चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे फॅशन विक आणि ऑस्टिन महानगरपालिका हॅकथॉन  या समुदाय भागीदार आहेत.  आंतरराष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धा ८ सप्टेंबर सायंकाळी 5.30 वाजेपासून ते 9 सप्टेंबर रात्री 9.00  वाजेपर्यंत पार पडणार आहे. या स्पर्धेचे यजमान  अमेरिकेतील टेकसास विद्यापीठ ऑस्टिन, आणि महाराष्ट्रातील पीआयसीटी महाविद्यालय आहेत.  सर्व सहभागी टीमला मार्गदर्शक आणि शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ नेमण्यात आलेले आहे. या स्पर्धेकरिता पुणे आणि ऑस्टिन शहरातील १२० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेला आहे . 

WebTitle : marathi news pune international hackathon tournament 

संबंधित बातम्या

Saam TV Live