पुणे शहरातील ३.९० ‘टीएमसी’वर इंदापूरचा हक्क

पुणे शहरातील ३.९० ‘टीएमसी’वर इंदापूरचा हक्क

पुणे - इंदापूर तालुक्यासाठी सोडले जाणारे नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पुणे शहराच्या साडेतीन टीएमसी पाण्यावर संक्रांत येण्याची शक्यता आहे. खडकवासला प्रकल्पातील ३.९० टीएमसी पाणी सणसर जोड कालव्याद्वारे इंदापूर तालुक्‍यातील २२ गावांसाठी देण्याची प्रकल्पीय तरतूद आहे. परंतु, ग्रामीण भागातील वाढलेले सिंचन क्षेत्र आणि शहरातील ‘पाणीबाणी’ पाहता हे कितपत शक्‍य होईल, हा खरा प्रश्‍न आहे.

खडकवासला प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठ्याच्या वाटपाबाबत पुणे पाटबंधारे विभागाने तयार केलेली अधिकृत टिप्पणी ‘सकाळ’कडे उपलब्ध झाली असून, त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. खडकवासला प्रकल्पात टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला ही चार धरणे येतात. त्यांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता २९.१५ टीएमसी आहे. यामध्ये टेमघरमध्ये ३.७१, पानशेत - १०.६५, वरसगाव - १२.८२ आणि खडकवासलातील १.९७ टीएमसी पाण्याचा समावेश आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील काही गावांसाठी  सणसर जोड कालव्याद्वारे ३.९० टीएमसी पाणी देण्याची प्रकल्पीय तरतूद आहे. परिणामी ही गावे जलसंपदा नियमन प्राधिकरणाकडे किंवा उच्च न्यायालयात जाण्याची शक्‍यता आहे. या गावांचे पाणी पुणेकरांना विनातक्रार वापरता यावे, यासाठी या गावांना नीरा डावा कालव्याद्वारे सणसर जोड कालव्यातून पाणी उपलब्ध करून देण्याचे ठरले होते. सणसर जोड कालव्याच्या प्रकल्प अहवालात ही बाब नमूद केलेली आहे.

खडकवासला प्रकल्पातून ३.९० टीएमसी पाणी सणसर जोड कालव्याद्वारे इंदापूर तालुक्‍यातील २२ गावांना देण्याची तरतूद आहे. परंतु बारामती, दाैंड आणि इंदापूर तालुक्यांतील सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. खडकवासला धरणापासून सणसर जोड कालवा हा सुमारे १७२ किलोमीटर आहे. त्यामुळे तिथपर्यंत निम्म्यापेक्षाही कमी पाणी पोचते. हे पाणी दिल्यास शेतीच्या आणि शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या हे शक्‍य नाही.
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

Web Title: khadakwasla Dam Water Storage

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com