खेड तालुक्यातील कळमोडी धरण शंभर टक्के भरलं

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 जुलै 2018

पुण्याच्या खेड तालुक्यातील कळमोडी धरण शंभर टक्के भरले. भुशी धरणानंतर जिल्ह्यात पूर्ण क्षमतेनं भरलेलं हे दुसरं धरण आहे. आरळा नदीवरील दीड टीएमसी क्षमतेचे कळमोडी धरण भरल्याने सात गावांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटलाय. कळमोडी धरण परिसरात आत्तापर्यंत 466 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. धरणातून आता 1 हजार154 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय. हे पाणी 10.52 टीएमसी क्षमतेच्या चास कमान धरणात जात असून, त्याठिकाणी 2.23 टीएमसी पाणी साठले आहे. चास कमान धरण परिसरात आत्तापर्यंत 298 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने ते भरायला आणखी मोठ्या पावसाची गरज आहे.

Web Title marathi news pune khed kalmodi dam full

संबंधित बातम्या

Saam TV Live