पुणे, कोल्हापूर सातारा घाटमाथ्यावर उद्या, परवा मुसळधार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुणे : पुराच्या तडाख्यातून सुटकेचा निश्‍वास टाकत असतानाच, पुन्हा पुणे, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने सोमवारी दिला. सह्याद्रीच्या कुशीतील धरणे 90 ते 95 टक्के भरली असून, त्यामध्ये सध्याच पावसाच्या पाण्याचा येवा सुरू आहे. 

सांगली, कोल्हापूर शहरांसह या जिल्ह्यांतील अनेक गावांना गेल्या आठवड्यात पुराचा फटका बसला. घाटमाथ्यांवर पडलेल्या पावसामुळे बहुतेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. नद्या दुधडी भरून वाहिल्या आणि त्यांचे संगम होत गेल्याने खालील भागात असलेल्या गावांमध्ये पाणी शिरले. या धरणांतून विसर्ग कमी केला असला, तरी आजही धरणांतून कमी प्रमाणात विसर्ग सुरू आहे. 

वेधशाळेने सोमवारी या आठवड्याचा पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यामध्ये या तीन जिल्ह्यांत घाटमाथ्यांवर काही ठिकाणी मंगळवारी व बुधवारी पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पावसाचा अंदाज घेत धरणांतून विसर्ग सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागणार आहे. 

कृष्णा खोऱ्याच्या या भागात बारा धरणे आहेत. त्यांची एकत्रित साठा क्षमता 209.88 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. त्यामध्ये आज सकाळी आठ वाजता एकूण 199.93 टीएमसी (95.27 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. राधानगरी 98 टक्के, कोयना 97.5 टक्के, वारणा धरण 92.8 टक्के, तर दूधगंगा 94.8 टक्के भरले आहे, तर धोम धरणात 90.8 टक्के पाणीसाठा आहे. कोयना धरणातून सुमारे 36 हजार घनफूट प्रति सेकंद (क्‍युसेक), तर अन्य धरणांतून सध्या किरकोळ स्वरुपात पाणी सोडण्यात येत आहे. 

Web Title : marathi news pune kolhapur satara rain forecast by IMD 

संबंधित बातम्या

Saam TV Live