Loksabha 2019 : बारामती, शिरूर, मावळसाठी पुण्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांची नियुक्ती 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 मार्च 2019

पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीसह शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतील लढती प्रतिष्ठेच्या केल्या असून, त्यासाठी पुण्यातील कार्यकर्त्यांची रसद पुरविण्यात येत आहे. या मतदारसंघांतील स्थानिक कार्यकर्त्यांच्या दिमतीला पुण्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. 

मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी शहरातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्यासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, महिला आघाडीच्या प्रमुख रूपाली चाकणकर, विशाल तांबे, प्रदीप देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्यावर जबाबदारी आहे. पक्षातील कार्यकर्ते अंकुश काकडे यांच्याकडे नगरच्या निरीक्षकपदाची जबाबदारी आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते बारामती, मावळ आणि शिरूरमध्ये प्रचार करणार असल्यामुळे पुण्यातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी काही मोजके कार्यकर्ते असतील, अशी चिन्हे आहेत. 

राष्ट्रवादीसाठी बारामती, मावळ आणि शिरूरमध्ये कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यासाठी शहराध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांवर पक्षाचे नेते अजित पवार यांनी जबाबदारी सोपविली आहे.

ॲड. वंदना चव्हाण पुण्यात 
‘खडकवासल्यातील पदाधिकाऱ्यांनी बारामती मतदारसंघात, तर हडपसरमधील कार्यकर्ते हे शिरूर मतदारसंघात काम करतील. नगर रस्त्यावरील काही कार्यकर्त्यांना मावळमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार वंदना चव्हाण पुणे शहरातील प्रचारात सहभागी होतील. एकंदरीतच चारही लोकसभा मतदारसंघांसाठी प्रचाराचे योग्य नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार प्रचार यंत्रणा काम करेल,’’ असे शहराध्यक्ष तुपे म्हणाले.

Web Title: Loksabha Election 2019 Baramati Shirur Maval NCP Activists Pune Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live